गोंडपिपरी शहराच्या पंचशील वार्डातील बोअरवेल गायब विनापरवानगी वैयक्तिक जागेवर मारली बोअरवेल नगरसेवक जितेंद्र इटेकर यांचा बोगस कारनामा #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरी शहराच्या पंचशील वार्डातील बोअरवेल गायब विनापरवानगी वैयक्तिक जागेवर मारली बोअरवेल नगरसेवक जितेंद्र इटेकर यांचा बोगस कारनामा #gondpipari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

शहरातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मागील वर्षी येथील पंचशील वॉर्डांत दलीत वस्ती योजने अंतर्गत बोअरवेल मंजूर करण्यात आली.मात्र सदर प्रभागाचे नगरसेवक जितेंद्र ईटेकर यांनी ती बोअरवेल आपल्याच घराजवळ व्हावी यासाठी प्रयत्न केला.स्वार्थ हेतूंनी अखेर त्यांच्या घरालगत असलेल्या गजानन  ईटकलवार यांच्या वैयक्तिक जागेवर नगरसेवकाच्या पुढाकारातून परवानगी न घेताच बोअरवेल मारण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आला आहे.


पंचशील वॉर्डांत जितेंद्र इटेकर यांच्या पुढाकारातून मागील वर्षी मारलेल्या बोअरवेल वरती अजूनपर्यंत हातपंप बसविण्यात आले नाही.हे तर सोडा उलट खड्डा मारलेल्या बोअरवेल वर घरमालकांनी चक्क बाथरूमच बांधून टाकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.वार्डातील या बोगस प्रकारामुळे बांधल्यांनी ती बोअरवेल नगरपंचायतच्या मालकीची की वैयक्तिक,हा प्रश्न पंचशील वार्डातील नागरिकांना पडला आहे.

या वार्डात अनेक समस्या अावासून उभ्या आहेत.सध्यास्थितीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील मुख्य रोडलगत आणि प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रत्येकी एक बोअरवेल आहे.पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या लक्षात घेऊन मागील वर्षी केलेल्या सर्व्हेक्षण बाणा नंतर प्रभाग क्रमांक ९ च्या क्षेत्रात दोन बोअरवेल मंजूर करण्यात आल्या.यातील एक बोअरवेल कुठे आहे अजूनपर्यंत थांगपत्ता लागला नाही.

त्यामुळे त्याचे पाणी कुठे मुरते य,याबाबत नगरसेवक बोलायला तयार नाही.दुसरीकडे त्यांच्याच पुढाकारातून मिळालेली दुसरी बोअरवेल सुध्दा संबंधित नगरसेवकाने जन हिताचा विचार न करता आपल्याच पदरी पाडण्याचा प्रयत्न केला.त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी घराला लागूनच बोअरवेल करिता लोकेशन दिले.मात्र ती जागा नगरपंचायतीची नसून दुसऱ्याची वैयक्तिक राहिली आहे.

यासाठी त्यांनी घरमालकाची कुठलीही लेखी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.त्या बोरवेलच्या खड्ड्यात घरमालकाने चक्क बाथरूम बनविले आहे.नगरसेवकाच्या अशा मनमानी कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत असून सदर प्रकरणी चौकशी करून नगरसेवक जितेंद्र ईटेकर यांच्यावर कडक प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.