अरेच्या ! ज्या रुग्नाला फळवाटप केले त्याच्याच हाती कार्यक्रमाचे बॅनर फळवाटप केलेला रुग्न व बॅनर पकडणारा एकच सोशल मिडीयावर फोटो व्हायरल गडचांदूर रुग्नालयात काॅग्रेस पक्षाचे अजब फळवाटप #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अरेच्या ! ज्या रुग्नाला फळवाटप केले त्याच्याच हाती कार्यक्रमाचे बॅनर फळवाटप केलेला रुग्न व बॅनर पकडणारा एकच सोशल मिडीयावर फोटो व्हायरल गडचांदूर रुग्नालयात काॅग्रेस पक्षाचे अजब फळवाटप #gadchandur

Share This

कोरपना : 
 
काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम काॅग्रेस पक्षाकडून राबवले जात आहे. यातच गडचांदूरात काॅग्रेस पक्षाने राबवलेला उपक्रम सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असल्याने जोरदार चर्चा होत आहे. या चर्चेमागील कारण अजबच आहे.

गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात कोरपना तालुका काॅग्रेस पदाधिका-यांनी खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्नांना फळवाटप केले. बेडवर ज्या रुग्नाला फळवाटप केले तोच रुग्न ठणठणीत असल्यासारखा रुग्नालयाबाहेर काॅग्रेस पदाधिका-यासोबत बॅनर पकडून उभा दिसत आहे. विशेष म्हणजे काॅग्रेसच्या नेत्यांसोबत सदर रुग्नाने बॅनर पकडून आपले फोटो काढून घेतले. तेच फोटो काॅग्रेस पदाधिका-यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने परिसरात खमंग चर्चा होत आहे. काही नागरिकांना फळवाटप कार्यक्रमातील हा प्रकार समजल्याने या उपक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर नागरिकांसाठी विनोदाचा भाग बनला आहे.

ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे काॅग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णांना मास्क व फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुका काॅग्रेस कमीटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी सभापती नागराज मंगरुळकर, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, हंसराज चौधरी, सभापती विक्रम येरणे, बाबा गोरे, सभापती जयश्री ताकसांडे, स्वीकृत सदस्य पापय्या पोन्नमवार, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे, कार्याध्यक्ष अहमदभाई, युवक काॅग्रेसचे लोकसभा महासचिव शैलेश लोखंडे, सुरेश टेकाम, प्रीतम सातपुते, विठ्ठलराव कांबळे, रुपेश चुदरी, राहुल ताकसांडे, आशिष वांढरे, महावीर खटोड, प्रणय टेकाम, अजय यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ज्या रुग्नाला फळवाटप केले, तोच रुग्न काॅग्रेस नेत्यांसोबत हातात बॅनर पकडून फोटोत दिसत आहे. फळवाटप केलेला व बॅनर पकडणारा एकच व्यक्ती असून काॅग्रेस नेत्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही ? याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गडचांदूर रुग्नालयातील काॅग्रेसच्या या अजब फळवाटपाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू आहे.