ब्रेकिंग : वर्धा नदीत युवकाचा आढळला मॄतदेह ; हत्या की आत्महत्या कारण गुलदसत्यात ?#found-dead - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : वर्धा नदीत युवकाचा आढळला मॄतदेह ; हत्या की आत्महत्या कारण गुलदसत्यात ?#found-dead

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्गुस प्रतिनिधी -

आज शनिवारला सकाळी दरम्यान घुग्घुस येथुन जवळच असलेल्या घुग्घुस-मुंगोली वर्धा नदीच्या पुला जवळ नदीच्या पात्रात एका युवकाचा मॄतदेह वर तरंगतांना पुलावरुन ये-जा करणारे नागरिकांना दिसला.

हि माहिती शिरपुर पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरिक्षक अनिल राऊत यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी वणी तालुक्यात पाठविले.

मॄतक युवकाचे नाव अविनाश शुकलाल प्रजापती (२९) रा. वांढरी फाटा, त. जि. चंद्रपुर असे असुन मागील तिन दिवसापासुन बेपत्ता होता.

दोन अन्य व्यक्ति त्याच्या बरोबर दिसून आल्याचे चौकशी अंति मृतकाचा मोठा भाऊ अरविंद प्रजापति वय वर्षे 31 याने सांगितले आहे.  एम आय डी सी परिसरात राहनारा व्यक्ति मुंगोलि परिसरात का आणि कशासाठी आला हे सुद्धा समझन्या पलीकडे के असून सदर मृत्यु हत्या कि आत्महत्या हे सध्या गुलदस्त्यात आहे.