चंद्रपूर बिग ब्रेकिंग : माहेरी आलेल्या नवविवाहितेचा आढळला मृतदेह :तिन महिन्याची होती गर्भवती : found-dead - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग : माहेरी आलेल्या नवविवाहितेचा आढळला मृतदेह :तिन महिन्याची होती गर्भवती : found-dead

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणविस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला.काल सायंकाळच्या सुमारास हि घटना समोर आली.लाँकडाऊनच्या पाच दिवसापुर्वी तिचा विवाह झाला होता.ती तीन महिन्याची गर्भवती होती.या घटनेमूळ परिसरात खळबळ माजली आहे.

भंगाराम तळोधी येथील रूचीता चिट्टावार हिचा विवाह 19 मार्च रोजी झाला होता.ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती.दरम्यान चार दिवसापुर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे आली होती.काल सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली.पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.यामूळ नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली.

दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून  आली.यामूळ शंकेची पाल चुकचुकली.गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली.यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला.

यामुळ कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला.लाँकडाऊनच्या अगदी पुर्वीच तिचा विवाह झाला होता.ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.रूचीता चा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थीत होत आहैत.ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पिएसआय पटले हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


रूचीताचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला.यानंतर तिचे शव गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.पण यावेळी वैदकीय अधिक्षक उपस्थीत नव्हते.ति तीन महिन्याची गर्भवती असल्याने दुसऱ्या डाँक्टरांनी आपणाकडून शवविच्छेदन शक्य नसल्याचे सांगितले.यामूळे रात्री तिचे शव चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले.