जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील नारायण पवार यांच्या घराला सिलेंडर स्फोटाने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.
पीडित कुटुंबाची आपबिती कळताच माजी अॅड.वामनराव चटप हे मदतीला सरसावले. अॅड. वामनराव चटप यांनी घटनास्थळी पाहणी केली. पीडित कुटुंबाला शेतकरी संघटनेच्या वतीने पाच हजार रुपये रोख मदत अॅड.दीपक चटप यांच्या हस्ते देण्यात आली.
तर कोलाम विकास फाउंडेशन व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून कुटुंबाला किराणा सामानाचे वाटप देखील केले.
आगीत गाडी, ऑटो, घरगुती सामानासाहित मोठी वित्त हानी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने देय मदत तातडीने द्यावी अशी सूचना माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी जिवती तहसीलदार यांना केली. यावेळी विकास कुंभारे, अॅड. दीपक चटप, लक्ष्मण कुळमेथे उपस्थित होते.