राजुरा तालुक्यातील चिंचोली बु, येथील बंडू उर्फ राजू दादाजी चंदे (वय 32 वर्षे ) यांनी काल दिनांक 19 जून रात्री 8 वाजता यांचा घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
प्राथमिक चौकशीत सदर शेतकरी कर्ज बाजरी असल्यामुळे नवीन खरीप हंगामाकरिता नव्याने कर्ज कसे मिळेल या चिंतेने ग्रस्त होता. त्याचेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था चिंचोली बु या सोसायटी चे कर्ज होते. मृतक कुटुंबात आई आणि पत्नी दोन महिला असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.