खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
देशात लॉकडाऊन ची स्तिती मुळे मागील वार्षि पिकलेल्या मालाची विक्री करायला अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. शिवाय मागील नापिकी, आता समोर उभा असलेला खरीप हंगाम त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त स्थितीत आहे.
अश्याच एका चिंतेतून राजुरा तालुक्यातील चनाखा येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज दिनांक 10 जून ला भर दिवसा स्वतःच्या राहत्या घरी आडोश्याला असलेल्या बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
चनाखा गावात ही घटना आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव सुरेश बरीकराव ठमके (55) असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा आप्त परिवार आहे.
प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर विविध बँकेचे कर्ज असून शेतीचा पुढील हंगाम कसा करायचा अशा विवंचनेत असताना त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.