"आदित्य " चा अचानक मृत्यू : वनविभागात खळबळ #elephanant-aditya-died-last-night - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"आदित्य " चा अचानक मृत्यू : वनविभागात खळबळ #elephanant-aditya-died-last-night

Share This
खबरकट्टा / गडचिरोली:- 

सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्प मधील अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला.त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

     
10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला होता.11 जून रोजी सकाळी 8:15 वा.त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र,चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अस्वस्थ झाला. तो खूप थकलेला आणि घाबरलेला होता.वन विभागाने त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू केले होते.
त्याने खाणेपिणे सोडून दिले होते.
    
काल रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते,अशी माहिती आहे.अखेर आज पहाटे आदित्य नावाच्या हत्तीचा पिल्लू ने अखेरचा श्वास घेतला.
    
नेमकं वनविभागाने जर विशेष लक्ष देऊन तज्ञ पशुवैदयकीय अधिकाऱ्यांना आणले असते तर,असा प्रकार घडला नसता अशी चर्चा सध्या कमलापूर गावात सुरू आहे.त्यामुळे याची योग्य चौकशी करावी अशी मागणी गावकाऱ्यांकडून केली जात आहे.