पोंभुर्णा तालुक्यातील भटारी येथील तलावात 12 वर्षाचा आदिवासी मुलगा खोल पाण्यात बुडून मरण पावल्याची दुःखद घटना काल (7 जून ) घडली.
गटारी या आदिवासी गावातील त्तलावात लहान मुल दररोज पोहायला जात असतात.नेहमीप्रमाणे सायंकाळी भटारी येथील तलावात लहान मुल पोहायला गेले. मारोती कोवे यांचा मोठा मुलगा कार्तिक मारोती कोवे (वय 12) हा सुद्धा त्या मुला सोबत पोहायला गेला असता. तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला.