रोजगार आवाहन :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आवाहन : कारखाने, कंपनीच्या रिक्तपदांची माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी :भैय्याजी येरमे : महास्वयम संकेतस्थळावर करावी नोंदणी #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रोजगार आवाहन :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आवाहन : कारखाने, कंपनीच्या रिक्तपदांची माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी :भैय्याजी येरमे : महास्वयम संकेतस्थळावर करावी नोंदणी #diochandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि.18 जून: (जिल्हा माहिती कार्यालय द्वारे )-

सद्यस्थितीत ज्या कारखाने, कंपनीला किंवा इतर आस्थापनेला अकुशल कामगार किंवा कुशल कामगार जसे-आय.टी.आय.संगणक अभियांत्रिकी इत्यादी उमेदवारांची आवश्यकता असल्यास कंपनीने भरावयाच्या रिक्तपदांची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आली आहे.

आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधून रिक्तपदाबाबतची संपूर्ण माहिती कार्यालयास कळविण्यात यावी. ज्या आस्थापणेला युझर आयडी, पासवर्ड उपलब्ध झालेला नाही त्यांनी  कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा. ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन प्रत्यक्ष ऑनलाइन निवड प्रक्रीयेव्दारे उमेदवारांची नियुक्ती करावी. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे.राज्य शासनाने संकेतस्थळावर कामगार हवे असलेल्या कपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन  केले आहे. कोविड-19 मुळे लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामूळे जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहे. परंतु आता कारखाने,कंपन्या सुरु झाल्यामुळे कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचप्रमाणे जे कामगार बाहेरगावी नौकरी करीत होते ते स्वगावी परत आले आहेत.

ज्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेली नाही त्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे त्यांनी आपली प्रोफाईल अद्यावत  (जसे- संपूर्ण शैक्षणिक पात्रता, अनुभव, अवगत असलेल्या भाषा, कौशल्य इ.) करावी. ऑनलाइन पद्धतीने जुन्या व नवीन नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी  युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांचे अवलोकन करावे. 

स्वतः च्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार योग्य पदाकरीता त्या कंपनीकडे ऑनलाईनपध्दतीने अर्ज सादर करावा.सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. अधिक माहिती व काही अडचण असल्यास या कार्यालयाच्या 07172- 252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.