चितळ पडले शौचालयाच्या खड्यात : दिड तासांच्या अथक प्रयत्नातून जीवनदान : #Deer fell into the pit - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चितळ पडले शौचालयाच्या खड्यात : दिड तासांच्या अथक प्रयत्नातून जीवनदान : #Deer fell into the pit

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जंगलातून भटकलेला चितळाचा बछडा गोंडपिपरी शहरात आला.शहरातील मोकाट कुत्रे मागे लागल्याने सैरभैर पडत सूटलेला चितळ पंचशिल बुध्द विहारा लगत असलेल्या शौचालयात खड्यात पडला. तब्बल दोन तासानंतर चितळाला खड्यातून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.खुल्या वनक्षेत्रात चितळाला सोडण्यात आले.

गोंडपीपरी शहराला लागुन दाट जंगल आहे. जंगलातील वन्यजिव शहरात अधूनमधून शिरकाव करीत असतात. शनिवारला सहा वाजताचा सूमारास भटकलेले चितळाचा बछडा शहरात आले. शहरातील मोकाट कुत्रे मागे लागल्याने सैरभैर पडत सूटलेला हा चितळ पंचशील बुध्द विहारालगत असलेल्या शौचालयाचा खड्यात पडला.


खड्याबाहेर बाहेर निघण्यासाठी त्याची धडपड सूरु होती.
घटनेची माहीती लागताच मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबाची टिम घटनास्थळी पोहचली. दोन तासांचा प्रयत्ना नंतर चितळाला खड्याबाहेर काढण्यात यश आले. चितळाला खुल्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.