शेत संरक्षक विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू : पावसाळ्याचे सतर्कता बाळगा #dead- - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेत संरक्षक विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू : पावसाळ्याचे सतर्कता बाळगा #dead-

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - गोंडपिपरी -

शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे शनिवारी (दि. 27 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश संतोष मडावी (रा. विठ्ठलवाडा) असे मृतकाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील अविनाश मडावी हा आपल्या मित्रासह येनबोथला येथे शेतात गेला होता. शेतातून परत येताना येनबोथला येथील शेतकरी मैदनवार यांनी शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पसरविलेल्या विजेचा प्रवाह असलेल्या विद्युत तारांना अविनाशचा स्पर्श झाला. यात अविनाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली.

मैदनवार याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश हा त्यांचा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मडावी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अविनाशच्या अवेळी जाण्याने विठ्ठलवाडा गावात शोककळा पसरली आहे.