यवतमाळ जिल्ह्यातून अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराना गुरुवारी सायंकाळी.अकरा वाजता च्या सुमारास सांगोडा नदी पात्रात सापळा रचून जेरबंद करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याच्या सीमे वरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातील सांगोडा गावाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पाळत ठेवून यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या सात दुचाकी तून ५७६ देशी दारू च्या नीपा प्रति नग शंभर रुपये प्रमाणे किंमत५७ हजार ६०० रुपये तसेच एम एच ३४ एवी ७६९७,एम एच ३४ एजी ७८५५, एम एच ३४ एफ २९५८,एम एच ३४ एजी १९३० क्रमांकाच्या चार बजाज पल्सर, एम एच ३४ एल ६१३४ क्रमांकाची सी बी झेड , एम एच ३४ बी क्यू ५४६५ युनिकॉन, विना नंबरची सुझुकी मोपेड या प्रत्येकी एक - एक अशा सात दुचाकी एकूण किंमत चार लाख ४४ हजार ४०० रुपये असा पाच लाख दोन हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले.
ही कारवाई कोरपनाचे पोलीस निरीक्षक अरुन गुरनुले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, वासनिक , पोलीस कर्मचारी सुधीर तिवारी, संजय शुकला, गजानन चारोळे,भगवान पडवाळ, रामचंद्र पुष्पपोळ , अविनाश ढोके, अश्विनी मालेकर आदींनी केली. या कारवाईने अवध दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले गेले आहे.