कोरपना शहरात स्वच्छ गांव सुंदर गांव स्वच्छ भारत अभियान फ़लक अनेक ठिकाणी लावण्यात आले. शौचालय बांधकामा सहित इतर स्वछता उपक्रमांवर 14 व्या वित्तीय आयोग निधि तुन वेग वेगळ्या उपक्रमावर लाखो चा निधि खर्च झाला.
मात्र नगर प्रशासनाच्या नियोजन व समन्वयाचा अभाव असल्याने झालेल्या बांधकामाचा उपयोग काय असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. याला कारणही साजेसेच, बोरगाव रस्त्यावर शहरात कचरा प्रकीया केंद्रात वर्गीयकृत कचऱ्याचे व्यववस्थापन होत आहे.
या मध्ये ओला कचरा, सुखा कचरा याचे वर्गीकरण करून कंपोस्ट प्रकीया ऐवजी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच गेल्या कित्येक दिवसांपासून भरून असून याकडे नागरपंचायत प्रशासनाने फिरकून पाहणे सुद्धा आवश्यक समजले नसल्याचे उघडकीस आले आहे.
कोरपना नगर पंचायत कचऱ्याच्या ऐवजी आता दारू बाटलांवर प्रक्रिया करण्याचा नाविण्य पुर्ण उपक्रम करीत आहे काय??? अशी चर्चा नागरिक करीत असून सध्या या प्रकल्पात दारू च्या रिकाम्या बॉटल चा खच पडून असल्याचे अनेक चित्र सोशल माध्यमांवर वायरल होत असल्याने नागरिकांच्या भुवया उचांविल्या आहेत. कारण शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया दिसत नाही.
मात्र एक वर्षा पासुन लाखो रूपये खर्चुन बांधलेल्या या घनकचरा नियोजन प्रकल्प केंद्राकडे नगर प्रशासनाचे सऱ्हास दुर्लक्ष दिसत असून आता हे प्रकल्प केंद्र दारू अड्डा तर नाही ना असा प्रश्न नगर वासियांना पडला आहे. त्यातही मात्र प्रक्रीया झाल्या नंतर दारु तर येणार नाही ना असे व्यंग व दारुबंदी असताना खाली बाटल्या या केन्द्रावर आल्या कश्या असा सवाल नागरिक करीत आहेत.