ब्रम्हपुरी पोलीसांनी हजारो रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त :ब्रम्हपुरी पोलीसांचे दारूतस्करांन विरुद्ध धाडसत्र सुरू.पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे येताच लाखो रुपयांचा अवैध दारू साठा जप्त #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी पोलीसांनी हजारो रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त :ब्रम्हपुरी पोलीसांचे दारूतस्करांन विरुद्ध धाडसत्र सुरू.पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे येताच लाखो रुपयांचा अवैध दारू साठा जप्त #darubandi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

ब्रम्हपुरी पोलीसांनी छोट्या मोठ्या दारू तस्करांच्या विरोधात धाडसत्र सूरू केले आहे.सविस्तर माहिती या प्रमाणे आहे गोपणीय खबर मिळाली की, नान्होरी गावाकडून ब्रम्हपुरीकडे एक मोटार सायकल वरुन  अवैध दारू येणार आहे. त्यावरून पोऊपनी शिवराज जाधव पोहवा खोब्रागडे नापोकाँ हेमके, नापोकाँ गजबे, पोशि ऊराडे, पोशि ईगोले यांना पाचारण करुन नाकाबंदी लावली. 

दरम्यान  एक मोटार सायकल येतांना दिसून आली त्याला अडवून पाहाणी केली असता सदर मौ सा वर देशी दारू  350 नग किमंत 35,000/- रू मिळून आला. मो सा क्र MH 34  SC- 2755  कीमत 25,000/-  एकूण किंमत 60,000 रु जप्त केले. 

आरोपी नामे विनोद गुंटिनवार याचेविरूध्द  गुन्हा नोंद केला ़ तसेच मौजा पिंपळगाव येथे मिळालेल्या माहीती वरून नितेश वालदे याचेकडे देशी दारू 20नग -2000 रू जप्त करुन त्याचे विरूद्ध गुन्हा नोंद केला. 

मौजा ऊचली येथे धाड टाकून आरोपी नामे सुरज धोंगडे याचेकडून देशी दारु 15 नग किंमत 3000/- रू जप्त करून त्याचेविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.