ब्रेकिंग : सक्रिय दारू बंदी समर्थकालाच दारू विकताना अटक #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : सक्रिय दारू बंदी समर्थकालाच दारू विकताना अटक #darubandi

Share This
◾️नांदा फाटा येथे दारू विक्रेत्यांवर कारवाई
◾️सामाजिक कार्यकर्ते व आर. टी. आय. कार्यकर्ते बनले दारू विक्रेते
◾️दारू बंदी समर्थक राजु बाळकृष्ण काळे यांना अवैध दारू विक्री करताना अटक
◾️सदर  अवैध दारूविक्रेतयाचे तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्याशी जवळचे संबंध
◾️ " दे बत्ती " दारू समर्थक करत आहे दारू विक्री
◾️नांदा फाटा येथे यांचे मोठा प्राणात सट्टा व्यवसाय सुरु असल्याच्याही चर्चांना उधाण.
 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील नांदा फाटा ते आवारपुर या मुख्य मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ  एका पानठेलावर आवाळपूर  येथील पोलिस चौकीतील कर्मचारी  यांनी कारवाई केली या कारवाईत ९० देशी चा टिल्लू जप्त करण्यात आले. या प्रकरणी  नांदा फाटा येथील राजु बाळकृष्ण काळे  यांचे विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

पेट्रोल पंप जवळ अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती आवारपुर पोलीस चौकी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी आवारपुर  यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, गडचांदूर पुलिस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली  कारवाई केली. यावेळी राजु बाळकृष्ण काळे यांच्या ताब्यातून ९० देशी दारूच्या टिल्लू जप्त करण्यात आले.

मागील दोन वर्षांअगोदर सदर आरोपी राजू काळे हे अवैध दारू विक्रेते व मद्यपी विरोधात राबविण्यात आलेल्या  " दे बत्ती " आंदोलनात  नांदा फाटा येथील काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत सक्रीय सहभागी असनारे दारू बंदी आंदोलनाचे कोरपना तालुक्यातील नेते यांना नांदा फाटा येथे अवैध दारू विक्री करताना अटक करण्यात आली. 

विशेष म्हणजे नांदा फाटा येथे येथील वैध दारू विक्रीची दुकाने व बीअर बार बंद करण्यासाठी आरोपीनी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण देखील  ८ वर्षे पुर्वी केले होते. यामुळे दारू बंदीचे समर्थक दारू विक्री करताना मोठय़ा प्रमाणात पकडल्या जात असुन तर जिल्हात वैद्य दारू विक्री सुरू करण्यात काय अडचण अशा प्रशन अनेक सामान्य जनतेला पडला आहे. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक गोपल भारती, वंसत तुमराम, रामा बिंगेवाड, नागोबा बुऱ्हाण यांनी केली आहे पुढील तपास गडचांदूर पुलिस करीत आहे.