चंद्रपूर ब्रेकिंग : दिवसा वेडसर -रात्री अट्टल चोर : लॉकडाऊन मध्ये सुशिक्षित युवकाचा गंभीर प्रताप : शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठान व घरफोड्या उघड #crime - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : दिवसा वेडसर -रात्री अट्टल चोर : लॉकडाऊन मध्ये सुशिक्षित युवकाचा गंभीर प्रताप : शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठान व घरफोड्या उघड #crime

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

लॉकडाऊनच्या काळात वेडसर दिसणारा युवक अट्टल चोर निघाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये समोर आली आहे . चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी पाळत ठेवून या अट्टल घरफोड्याला अटक केली आहे. हा आरोपी शहरातील रस्त्यांवर बावळटपणाचा वेश घेऊन फिरायचा आणि कोठे काय आहे याची पाळत ठेवायचा. मात्र, रात्री याच माहितीचा उपयोग करुन तो चोरी आणि घरफोड्या करायचा.

या आरोपीने शहरातील अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. या तपासात संजय गांधी व्यापार संकुलातील चोऱ्यांसह रेल्वे स्टेशन भागातील चोऱ्याही उघडकीस आल्या आहेत. 

पोलिसांनी या वेडसर वेशातील अट्टल चोराकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.गेले 3 महिने शहरात लॉकडाऊन होता. मात्र, असं असतानाही चंद्रपूरमधील बंद असलेल्या दुकानांमधून चोरी होत होती. 

या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हान ठरल्या होत्या. यानंतर चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी शहरात वेडेपणाचं सोंग घेऊन फिरत असलेल्या एका युवकावर पाळत ठेवली. यात संबंधित युवकावर संशय बळावल्याने या चोऱ्यांप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आणि तपासात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले.


चंद्रपूरच्या संजय गांधी व्यापार संकुल आणि रेल्वे स्थानक परिसरातील ताज्या घटनांनंतर पोलिसांनी या भागात पाळत ठेवली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांना वेडेपणाचं सोंग घेऊन शहरात चोऱ्या करणाऱ्या आरोपी मंगेश कुमरे नावाच्या युवकाला अटक करण्यात यश आले आहे. 

तो शहरातील रस्त्यांवर दिवसा बावळट वेश घालून वेडेपणाचं सोंग करायचा. दिवसा सावज हेरायचा आणि रात्री त्यावर हात साफ करायचा अशी या चोराची मोडस ऑपरेंडी होती. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अटक केली. 

त्यानंतर हा एक शिक्षित युवक असून तो बावळट वेश परिधान करत अट्टल चोरीचे आपले गुन्हे लपवत असल्याचं उघड झालं. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडी आणि दुकान फोडीतून जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी याबाबत माहिती दिली.