आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे जगातील अनेक देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे, त्यामुळे आपल्या देशातसुद्धा कोरोना महामारीतुन सावरण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला प्रधानमंत्री सहायता निधीत मदत जमा करण्याचे आव्हान केले होते त्याअनुषंगाने देशातील अनेक नागरिकांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधीस मदत केली.
त्याच धर्तीवर भारतीय जनता पक्षातर्फे चंद्रपुर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये मदत निधी जमा करण्याचे कार्य सुरू करण्यात आले होते,राजुरा विधानसभा क्षेत्रातील नारंडा गावामध्ये भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या सोबत सत्यवान चामाटे,मंगेश तिखट यांनी २५०च्या वरती नागरिकांकडून वर्गणी जमा केली,त्यामध्ये एकूण २० हजार रुपये नारंडा येथील नागरिकांकडून जमा करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत जे कोरोना योद्धा आपल्या जीवाचे रान करून लढत आहेत व आपल्या देशाची अहोरात्र सेवा करत आहेत त्यांच्या करिता एक छोटीशी मदत म्हणून गावातील नागरिकांनी मदत केली.