सध्या कोरोना महामारीचे देशावर महाभयंकर संकट आहे. टाळेबंदीमुळे मानवी जीवनमान विस्कळीत झाले आहे. आदिवासीबहूल ग्रामीण भागात गावागावातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातच बिबी येथील शेख दापंत्यांने लग्नाच्या वाढदिवशी आदिवासीबहूल गेडामगुड्यातील संपुर्ण ग्रामस्थांना मास्क, साबन, सॅनिटायजरचे वाटप करुन व प्रत्यक्ष स्वच्छतेचे प्रात्यक्षिक करुन दाखवून कोरोना मुक्तीसाठी जनजागृती केली. या अभिनव उपक्रमातून समाजापुढे त्यांनी नवा आदर्श ठेवला आहे.
बिबी येथील आशा गटप्रवर्तक फर्जाना शेख या कोरोना योद्धा म्हणून शासनाच्या सुचनेनुसार जनजागृतीचे काम करत आहे. त्यातच त्यांचा लग्नाचा १४ वा वाढदिवस आला. लग्नाचा वाढदिवस कोरोना मुक्तीसाठी जनजागृतीने साजरा करावा अशी भुमीका फर्जाना शेख यांनी त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते हबीब मेहबूब शेख यांचेकडे मांडली. त्यांनी लगेच होकार देवून राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याचे ठरवले.
ग्रामपंचायत बिबी अंतर्गत येणा-या आदिवासीबहूल गेडामगुडा येथील नागरिकात कोरोना जनजागृतीसाठी शेख दांपत्यानी पुढाकार घेतला. गावातील संपुर्ण नागरिकांना सोशल डिस्टंन्स पाळण्याबाबत पती-पत्नींनी माहीती दिली व महत्त्व पटवून सांगितले. सर्व कुटुंबांना डेटाॅल साबन तसेच सॅनिटायजर दिले. गावातील नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
विशेषता गावक-यांना साबन व सॅनिटायजरने हात कसे स्वच्छ धुवायचे याबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेख दांपत्यांनी करुन दाखवले. यावेळी आशा गटप्रवर्तक सुनिता मडावी, आशावर्कर निता चिकराम उपस्थित होते. आदिवासीबहुल गेडामगुड्यातील नागरिकांनी जनजागृतीबद्दल शेख दांपत्याचे आभार व्यक्त आहे. लग्नाच्या वाढदिवशी कोरोना योद्धा म्हणून पती-पत्नीने पुढाकार घेवून गेडामगुड्यात राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.