राज्यातला लॉकडाऊन उठवता येणार नसल्याची घोषणा. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडू नका. कोरोनाचे संकट अजून टळलेलं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #cmlive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यातला लॉकडाऊन उठवता येणार नसल्याची घोषणा. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडू नका. कोरोनाचे संकट अजून टळलेलं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #cmlive

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 28 जून - मुख्यमंत्री लाईव्ह -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (28 जून) रोजी दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील परिस्थितीसोबतच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर भाष्य केलं. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

⭕️ मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे...

1) 1 तारखेपासून जिथे गरज आहे तिथे जास्त काळजी घ्या

2) पीपीई किट आणि मास्क यांचा मुबलक साठा.

3) पावसाळ्यात साथीच्या रोगाविषयी खबरदारी घ्या.

4) शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहणार याकडे लक्ष देऊ.

5) 15 दिवसात 16 हजार कोटींचे करार केले.

6) सर्व गणपती मंडळांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला, त्यांचेही आभार.

7) विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार.

8) अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

9) 1 जुलै पासून लॉकडाऊन संपला असं समजू नका.

10) 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक गोष्टी सुरू करत आहोत.

11) जीव जगवणाऱ्या डॉक्टर आणि शेतकऱ्यांना माझं वंदन.

12) लॉकडाऊन असताना आपण घरात बंद असलो तरी शेतकरी आपल्यासाठी उन्हात राबत आहे.

13) निसर्ग वादळाने ज्यांचं नुकसान झालं त्यासर्वांच्या पाठीशी सरकार.

14) आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे.

15) निसर्ग चक्रिवादळात मनुष्यहानी कमीत कमी करण्यात यश.