ब्रह्मपुरीतील सफारा लाईन मध्ये चोरी : अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल #bramhapuri. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरीतील सफारा लाईन मध्ये चोरी : अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल #bramhapuri.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी-


ब्रह्मपुरी शहरातील सफारा लाईन मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.सफारा लाईन मध्ये व्यवसायीक म्हनुन वैभव कंरडे यांचे कंरडे जेव्लर्स म्हनुन दुकान आहे.वैभव हा अकरा बारा वर्षे आगोदर एका जेव्लर्स शॉपी मध्ये कारागीर म्हनुन काम करत होता.

नंतर त्यांने स्व:ताच्या मालकीची जेव्लर्स शॉपी सुरू केली.लॉकडाऊन असल्याने रविवारी दुकान बंद असल्याने रक्कम व जेव्लरी  दुकानात ठेवून गेले.सोमवार ला त्यांचा पुतन्या दुकान सुरू करण्यासाठी गेले असता दुकानाची कुलुप साखळी तुटून असल्याचे दिसून आले.

दुकानातील रक्कम व जेव्लरी सदर १किलो ९०० ग्राम चांदी,२तोडे सोने ,३० हजार रुपये रोख असा एकूण १लाख ५४ हजार रुपयांचा माल चोरी झाल्याचे उघडकीस आले.यांची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली.

प्राथमिक चौकशी मध्ये शॉन पथक व फिंगरप्रिंट घेण्यात आले.प्राथमिक चौकशी उप पोलिस निरीक्षक सय्यद अख्खतर, संदेश देवगडे,पुढिल तपास उप पोलिस निरीक्षक  अश्विन खेडीकर करत आहेत.