ब्रम्हपुरी पोलीसांनी आठ दिवसांत लाखो रुपयांची अवैद्य दारू जप्त केली आहे. अनेक ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी शहरात अवैद्य धंद्यांना चांगलाच उत आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पण ब्रम्हपुरी पोलीसांनी अवैध धंदे करणार्या च्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अनेक छोटे मोठे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर माहिती या प्रमाणे आम्हाला गोपणीय खबर मिळाली की, ईसम नामे पुंडलीक खेडकर, कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी हा त्याचे घरी अवैध दारू विक्री करीत आहे.
त्यावरून पोऊपनी खेडीकर पोउपनी जाधव पोहवा पेटकर नापोकाँ हेमके यांना पाचारण केले़ त्याचे घरात आँफीसर ब्लू कंम्पनीच्या -65 नग किंमत 19,500/- रु असा मिळून आला. सदर आरोपी विरूध्द अप क्र 285/2020 कलम 65 ई मदाका अन्वये गुन्हा नोंद केला.
तसेच मौजा जुगनाळा कडून एक मोसा वरून अवैध दारू येत असल्याची खबर आम्हाला मिळाली त्यावरून वरील स्टाफ ला पाचारण केले त्यांना मोसा क्र MH 34- BT 3474. मिळून आली सदर मोसा वर 100 नग देशी दारू मिळून आली मोपेड मोसा किंमत 43,000/- रू दारूची किंमत 10,000/- रू एकूण किंमत 53,000/- रू आरोपी नामे अमर डांगे विरूध्द अप क्र 287/2020 कलम 65 ई मदाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.