आरोग्य कर्मचार्‍यांचे बेमुदत आंदोलन #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आरोग्य कर्मचार्‍यांचे बेमुदत आंदोलन #bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :- 
ब्रह्मपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमितपणे शासन वेतन समायोजन करावे यासाठी दि. 13/06/2020 पासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे.                 

जिल्ह्यात या अभियानातील आरोग्य कर्मचाऱ्यांची  संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना अद्याप शासन सेवेत नियमित केलेले नाही. त्यासाठी हे कर्मचारी मागील महिन्यापासून महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहेत. 

बेमुदत आंदोलनात  शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करावी, नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना जुन्या कर्मचाऱ्या पेक्षा जास्त पेमेंट देण्यात यावा, अशाप्रकारे मागण्या करण्यात आलेले आहेत.तिसऱ्या  टप्प्यांमध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी स्वसंरक्षण साहित्य न वापरता कोविल कक्षांमध्ये सेवा देत आहेत. शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. 

ट्रेनिंग घेत आहे लोक सेवा देत आहेत. आजपासून त्यांच्या आंदोलनाच्या चौथा टप्पा सुरू झाला आहे. बेमुदत आंदोलन ब्रह्मपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर सुरुवात केली आहे.