चंद्रपूर मनसे चा चिनी मालावर बहिष्कार : चिनी ध्वज जळून व्यक्त केला संताप #boycot-china - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर मनसे चा चिनी मालावर बहिष्कार : चिनी ध्वज जळून व्यक्त केला संताप #boycot-china

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर – 

चीनने भारता विरोधात केलेल्या हल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतूत्वात काल दिनांक 19 जून रोजी तूकूम येथे चौकात चिनी वस्तू जाळून चिनचा निषेध करण्यात आला.

यावेळी चिनी सैनिकांचा हलल्यात शहीद भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तसेच चिनी वस्तू जाळून चीनचा करण्यात आला.चीनला भारताचे चोख प्रती उत्तर देऊन चिनी सैनीकांना धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी चिनी कंपनीचे मोबाइल ,इलेक्ट्रिक सिरीज ,चीनी ध्वज आदी वस्तू जाळण्यात आल्या.

आंदोलन मधे जिल्हा अध्यक्ष महिला सेना सुनीता ताई गायकवाड, शहर सचिव सुमित करपे , मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे ,मनविसे शहर अध्यक्ष नितीन पेन्दाम, महिला सेना जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके, विभाग अध्यक्ष वंदना वाघमारे, विभाग अध्यक्ष स्वाभी राऊत ,शाखा अध्यक्ष संगीता धात्रक, संदीप आरडे ,मिथुन महाकूल्कर ,नितेश जांभूळकर ,नितीन बावणे ,रविश आडेपवार ,राहुल मडावी ,अनिकेत सातपुते ,राम सारवा,क्रुष्णा दरवे, किशोर डोये,अनिल कपाटे,आदी मनसे सैनीक उपस्थित होते.