ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील वैचारिक विचारांची महती ठेवणारे मंगल पारधी यांनी सामाजिक बांधिलकी जपुन जगाला आपल काहीतरी देणे आहे म्हणून व ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना रक्तासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता. व अनेकांचा जिव सुध्दा गमवावा लागत असल्याने पारडगाव रक्त पेटी या नावाने एक वॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला.
त्या माध्यमातून अनेक गरजुना आतापर्यंत हजारो च्या पुढे रुग्णांना रक्तदाते शोधून रक्त पुरवठा करण्याचे काम आज पर्यंत केले. प्रत्येक रक्तदात्यांना रक्ताचे महत्त्व पटवून देण्यासाठी अग्रेसर असुन रक्त दानामुळे आपण एकादायांचे प्राण वाचवु शकतो. त्यामुळे जिवंत काही पुण्य मिळवायचे असेल तर रक्त दान करा कारण रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन खिस्तानंद हॉस्पिटल यांनी मंगल पारधी व पवन मेत्राम यांचा भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. यामुळे सर्व तालुक्यात या दोघांचे कौतुक होत आहे.