31 मे अहिल्याबाई होळकर जयंती व ६ जून शिवराज्याभिषेक दिना निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रक्तदान सप्ताह साजरा करण्यात आला.
दि. 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर जयंती व दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच औचित्य साधून दि.5 जून 2020 रोज शुक्रवार ला ख्रिस्तानंद हॉस्पिटल रक्तपेढी येथे संभाजी ब्रिगेड ब्रम्हपुरी विभागा च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर शालेय विदयार्थी मित्रांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.तेव्हा कोरोना रोखण्याकरता घालून दिलेले संपूर्ण निकष पाळत त्यासोबतच आपली व रक्तदात्याची संपूर्ण सुरक्षितता घेत रक्तदान शिबिर संप्पन झालं.
यावेळी जगदीश पीलारे,सोनुभाऊ नाकतोडे, राजेश माटे, सुभाष बगमारे, स्वप्नील देशमुख, गौरव भेंडारकर, राहुल सोनटक्के, महेश तलमले, अँड. आशिष गोंडाने, आशिष पांडव, नितेश पांडव, युगल नागदेवते, किशोर प्रधान, रुपेश उरकुडे, मोरेश्वर लोखंडे, राकेश शेंडे, भागवत लोणारे, निलेश राऊत, अमोल ठेंगरी, पुरुषोत्तम तुपट, विवेक रामटेके, नितेश कांबळी, सुनील पाथोडे, प्रशांत मेश्राम, निखिल साग्रे, सुजित दहिवले, शुभम कऱ्हाडे यांनी रक्तदान केले.