संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा जनतेच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासन सर्वतोपरी यशस्वी प्रयत्न करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी न थुकणे व मास्कचा वापर करणे प्राथमिक उपाय असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्कचा वापर न करण्यावर दंड आकारणे तथा कडक कारवाई करण्याची मागणी भाजयुमो तर्फे आदित्य डवरे,सत्यम गाणार यांनी एका पत्रातून केली आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक मास्क न लावता वावर करीत असून थुुंंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग धोकादायक ठरू शकतो.त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न फोल ठरत असून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक बळकट होत आहे.सुगंधित तंबाखु खाऊन रस्त्यात थूंकणार्यांची संख्या वाढतच आहे.
तसेच रस्त्यावरून दुचाकीने जात असतांना मध्येच कोणतरी थूंकतो आणि त्यांचे जंतू हवेव्दारे दुसर्या नागरिकांपर्यंत पोहचू शकतो.त्यामुळे अशा बेजबाबदार इसमांवर कारवाई करावी जेणेकरून थुंकणार्यावर निर्बंध येणार आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापर करणार्यांवर दंडनीय व कठोर कार्यवाही केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल व प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपक्रमाना यश प्राप्त होईल. अशी मागणी भाजयुमो, आदित्य डवरे,सत्यम गाणार,शुभम खिरटकर,अभि वांढरे यांनी केली आहे.