सास्ती-गोवरी जि. प. क्षेत्रात पांदण रस्त्यांना मंजुरी द्या : श्री. उमाकांत धांडे, अध्यक्ष -चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग यांची प्रशासन, लोकप्रतिनिधिंकडे मागणी #राजुरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सास्ती-गोवरी जि. प. क्षेत्रात पांदण रस्त्यांना मंजुरी द्या : श्री. उमाकांत धांडे, अध्यक्ष -चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग यांची प्रशासन, लोकप्रतिनिधिंकडे मागणी #राजुरा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी जिल्हा परीषद सर्कल मधील अनेक गावांतील शेतक-यांना शेत शिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. यामुळे पावसाळयात शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असुन, बी-बीयाणे, खते शेतापर्यंत नेण्यासाठी तसेच शेतातुन शेतमाल आणण्यासाठी मोठी अडचण होते. 

या अनुषंगाने सदर पाणंद रस्ता योजनेअंतर्गत या रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावी अशी मागणी प्रशासन, लोकप्रतिनिधींना करण्यात आलेली आहे.

◾️निर्ली ते साखरी रस्त्यावरून पश्चिमेकडे श्री राजु धांडे व श्रीनिवास महाकुलकर यांचे शेतापासुन श्री मारोती दुबे व श्री भाऊजी टिपले यांचे शेता जवळील शकरदेव मंदीरा पर्यंत १ कि.मी., 

◾️चार्ली ते साखरी दरम्यान श्री नानाजी गौरकार यांचे शेतापासुन श्री अविनाश गोरे आणि श्री नामदेव गावंडे यांचे शेतापर्यंत २ कि.मी., 

◾️धिडशी ते चार्ली दरम्यान श्री बंडु भोयर ते शामसुंदर घाटे यांचे शेतापर्यंत १.५ कि.मी., धिडशी गावापासुन पुर्वेकडे श्री गणपत काकडे यांचे शेतापासुन श्री रविंद्र चटके यांचे शेतापर्यंत २ कि.मी. 

◾️धिडशी ते पेल्लोरा रस्ता ते माड लहानद्ध दरम्यान श्री देवाळकर यांचे शेतापासुन श्री भोयर याचे शेतापर्यंत १५ कि.मी., 

◾️साखरी ते पेल्लोरा दरम्यान श्री खशाब खजे आणि श्री मनोहर पारखी यांचे शेतापासुन पेल्लोरा गावापर्यंत  २ कि.मी., 

◾️किन्हबोडी रस्त्यापासुन दक्षिणेकडे श्री निळकंठ झाडे यांचे शेत ते श्री मिलमिले यांचे शेत जवळील नाल्यापर्यत १ कि.मी.,किन्हबोडी येथील श्री रमेश झाडे यांचे शेतापासुन स्मशानभुमीपर्यंत २ कि.मी., 

◾️गोवरी ते अंतरगाव दरम्यान श्री बाळा इटनकर आणि श्री रामदास जीवतोडे यांचे शेतापासुन श्री देवीदास ठेंगणे आणि श्री महादेव कावडकर यांने शेतापर्यंत १.५ कि मी.,

◾️ मानोली ते कोलगाव दरम्यान मानोली गावापासुन श्री वासुदेव हिंगाणे यांचे शेतापर्यंत ३ कि.मी., कढोली (ब) ते चाली रस्त्यावर श्री नत्थू चटके यांचे शेतापासून पुढे १कि.मी., 

◾️कढोली (ब) ते कोलगांव रस्त्या ते मानोली दरम्यान श्री दत्तु हिंगाणे यांचे शेतापासुन श्री उमरे यांचे शेतापर्यंत १ कि.मी.

शासनाचे पांदण रस्ता योजना या रस्त्याचे कामांस मंजुरी देण्याची मागणी चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.