अनेक वर्षांपासून समस्या च्या विळख्यात लाडज वासिय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अनेक वर्षांपासून समस्या च्या विळख्यात लाडज वासिय

Share This

◾️लोकप्रतिनिधी व प्रशासन विरूद्ध नागरिकांत उदासीनता...
◾️पावसाळ्यात नागरिकांना करावी लागते मोठी कसरत.....
◾️कोटी रुपयांचा निधी मंजूर,पण अद्यापही कामाला सुरुवात नाही...
◾️लाडज गाव चिमुर विधानसभा मतदारसंघा मध्ये .....
◾️पालकमंत्री वीजय वडेट्टीवार लक्ष घालतील काय , नागरिकांनात संभ्रम निर्माण.....


खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
              
ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज हे गाव नदि च्या बेटावर वसलेले आहे. या गावांच्या सभोवताल वैनगंगा नदी वाहते.या गावाला एक बेट म्हनुन ओळख आहे.

या गावातील लोकांचा  दळणवळण करण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे.पण पावसाळ्यात या रस्त्यावरून ओसंडून नदी वाहत असते. 

गावातील गर्भवती महिलांना वेळेवर दवाखान्यात घेऊन जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.शालेय विद्यार्थी तालुक्यावर शिक्षण घेण्यासाठी जात असतात.गावामध्ये फक्त सहाव्या वर्गा पर्यंत शाळा आहे.आणि उर्वरित शिक्षण घेण्यासाठी तालुक्यावर नावे वर बसून नदी पार करावे लागते.तरी शिक्षण पुर्ण करण्यासाठी नेहमी जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात.लाडज या गावात सन २०१६,२०१७,२०१८,२०१९, या काळात महापुर आले होते.

पण या महापुरात जिवीत हाणी झाली नाही हे भाग्यच समजले जाते.आणि इतकेच नाही तर सन १९९४ मध्ये पण भयानक महापुर आले होते.जिवीतहाणी सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाली होती.शेतकऱ्याचे खुप नुकसान झाले होते.प्राणी सूध्दा मरण पावले होते.

लाडज व चिखलगाव येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला होता.प्रशासनाला वेठीस धरले होते.पण प्रशासनाने फक्त पुलिया बांधून देण्याचे आश्र्वासने दिलें पण अद्यापही आश्र्वासन पुर्ण झाले नाही आहे. 
            
लोकप्रतिनिधी यांनी निवडणूक काळात अनेक आश्र्वासनाची खैरात वाटली.शासनाकडुन कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली.भुमिपुजन सुध्दा करण्यात आले.पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत या कामास सुरुवात झाली नाही.कारण आता पावसाचे आगमन सुरू झाले आहे.यावर्षी हवामान खात्याने पाऊस जास्त पडण्याचे संकेत दिले आहे.

या वर्षी जर नद्या जर ओंतबुन वाहतील तर लाडज वासियाचे दळणवळण करण्यासाठी नदी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने याचं रस्ता ने अवमान करावे लागते.यात जिवीत हाणी सुध्दा होवू शकते.लाडज गावातील लोकांना तालुक्यावर जाण्यासाठी अजुन पर्यंत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा रस्ता प्रशासनाने तयार करून दिले नाही.पावसाच्या दिवसांत या गावाचा संपर्क तालुक्याशी तुटतो.

अनेक वर्षांपासून या गावातील लोकांची एका पुलियाची मागणी आहे.पण प्रशासन व लोकप्रतिनिधी हे या समस्येला गांभीर्याने घेत नसल्याचे बोलल्या जात आहे.पुलिया तयार करण्यात येत नसेल तर एक सुलभ मार्ग तयार करून देण्यात यावे.अशी मागणी कारण विद्यार्थी, नागरिक, गर्भवती महिला, आणि आजारी महिला यांनी केले.

चार महिने पुरेल इतके अन्न धान्य व औषध यांची व्यवस्था प्रशासना कडुन करण्यात आली आहे.व बुर्जुक महिला व पुरुष यांची सुध्दा व्यवस्था केली आहे.गर्भवती महिला ना नातेवाईकांन कडे जाण्याच्या सुचना करण्यात आले आहे.-विजय पवार,  तहसीलदार ब्रह्मपुरी