चंद्रपूर ब्रेकिंग : सभ्य वस्तीत सेक्स रॅकेट ! जगन्नाथ बाबा नगर येथे छापेमारीत तिघांना अटक :घरात आंबटशौकिनांची वर्दळ वाढली - लॉकडाऊन मध्ये नागपूर हुन येऊन देहविक्री ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : सभ्य वस्तीत सेक्स रॅकेट ! जगन्नाथ बाबा नगर येथे छापेमारीत तिघांना अटक :घरात आंबटशौकिनांची वर्दळ वाढली - लॉकडाऊन मध्ये नागपूर हुन येऊन देहविक्री !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
चंद्रपूर शहरातील सभ्य वस्ती समजल्या जाणाऱ्या जगन्नाथबाबा नगरातील एका घरात काही दिवसांपासून सेक्‍स रॅकेट सुरू होते. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी या सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केला. 

सोमवारी, 8 जूनच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून नागपूर येथील एका युवतीसह एक महिला आणि दलालाला अटक केली आहे. 

या प्रकरणी ताब्यात घेतल्यानं मध्ये एक महिला, एक युवतीसह दलाल शेख इरफान शेख अहमद (26) रा. जलनागर यांचा समावेश आहे. 

सदर घरात मागील अनेक दिवसा पासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांचा गुन्हे शोध पथकाला मिळाली. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायावर धाड टाकली .

त्यानंतर पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी तेथे एक युवती, महिला आणि दलाल आढळून आले. या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यातआलेली युवती नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. 

लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. अशा स्थितीत नागपूरची युवती देहविक्री व्यवसाय करण्यासाठी नेमकी चंद्रपुरात आली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शेवाळे एपीआय मलिक, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, यांचा सह गुन्हे शोध पथकाने केली.