सजग ! : भूमिपुत्र युवा ऐकता बहु .संस्था चे वतीने _वीज पडून म्रुत्यु पावलेल्या शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात #bhumiputra-yuwa-ekta-sangh - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सजग ! : भूमिपुत्र युवा ऐकता बहु .संस्था चे वतीने _वीज पडून म्रुत्यु पावलेल्या शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात #bhumiputra-yuwa-ekta-sangh

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सामाजिक -

भूमिपुत्र युवा ऐकता बहु. संस्था  जगाचा पोशिंदा असलेल्या  शेतकरी बांधवांचे मदतीला नेहमीच धावून गेलेली आहे. चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव येठी श्री. शंकर वैद्य या युवा शेतकऱ्याचा   शेतात  वीज पडून नुकताच मृत्यू झाला. 

आई वडीलांना एकुलता एक असलेल्या शंकर चे अकाली मृत्यूने वृद्ध आई वडील त्याची पत्नी आणि चिमुकल्या दोन मुलांवर मोठा काळाचा आघात झाला. त्याच्या कुटुंबाला या दुःखातुन सावरण्यासाठी सांत्वन पर भेट देत भूमिपुत्र युवा बहु .संस्था चंद्रपुर चे वतीने  तीस हजार रुपये मदत निधी म्हणून त्याचे पत्नीस धनादेश सुपूर्द करण्यात आला. 
       
शेतकरी कुटुंबावर आलेल्या दुःखात भूमिपुत्र संस्था सामाजिक बांधिलकी जोपासून आर्थिक मदत करीत आलेली आहे. शेणगाव येथील दुर्दैवी घटनेनंतर संस्थेचे सदस्यांनी ताबडतोब निधी उभा करण्याचे ठरवले. 
       
यात संस्थेचे देणगीदार  सभासदांनी प्रतिसाद देत शेतकरी बांधवाचे कुटुंबाला आर्थिक मदत  केली. यापूर्वी गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबांना आर्थिक सहकार्य असे उपक्रम भूमिपुत्र संस्थेने राबविले आहेत.