वनपरिक्षेत्र बल्लारशाह अंतर्गत उपक्षेत्र बल्लारशाह, नियतक्षेत्र बल्लारशाह मधील कक्ष क. 494 मध्ये दिनांक 09.06.2020 ला रात्रोच्या वेळेस रेतीची अवैध वाहतुक होत असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीचा आधारे रात्रो 10.40 वा. सुमारास सापळा रचुन ट्रक्टर क्र. MH 3310645 ट्रॉली क्र. MH 34 BR-4341मध्ये अवैधरित्या रेती वाहतूक करतांना मोक्यावर पकडण्यात आले.
सदर ट्रक्टर ही नामे श्री शेख रशीद शेख अमीर रा. डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर यांचे मालकिचे असल्याचे चौकशीत आढळले. नमुद ट्रक्टर मोक्यावर जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालय बल्लारशाह येथे जमा करण्यात आले.
आरोपी शेख रशीद शेख अमीर यांचे विरुदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) ग अनव्ये प्रा. गु. क्र. 12/11 दि.09.06.2020 जारी करण्यात आला.
सदर ट्क्टर जप्तीची कार्यवाही श्री. नरेश भोवरे वनक्षेत्र सहाय्यक बल्लारशाह , श्री.सिदधार्थ कांबळे वनरक्षक बल्लारशाह श्री. देवराव टेकाम वनरक्षक (विसापुर -1.)श्री. संजय सुरवसे वनरक्षक केम व श्री. राजेश पिंपळकर वनरक्षक (विसापुर-2 )यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली.
प्रकरणाचा पुढील तपास श्री. संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांचे मार्गदर्शनात श्री. नरेश भोवरे वनक्षेत्र सहाय्यक बल्लारशाह हे करित आहेत.