राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर : सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अँड.संजयभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांना यश : एन्यूटी हायब्रीड अंतर्गत ७२० कोटी रुपये निधी अंतर्गत २१२ किमी रस्त्यांची कामे मंजूर :नारंडा फाटा-अंतरगाव-कवठाळा-पवनी व बहुप्रतिक्षित भोयगाव-गडचांदूर रस्त्याचे काम सुरू :कोरपना,गडचांदूर व जिवती भागातील नागरिकांना चंद्रपुरला जाणे होणार सोयीचे :राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामे सुरू #anuity_hybrid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर : सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अँड.संजयभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांना यश : एन्यूटी हायब्रीड अंतर्गत ७२० कोटी रुपये निधी अंतर्गत २१२ किमी रस्त्यांची कामे मंजूर :नारंडा फाटा-अंतरगाव-कवठाळा-पवनी व बहुप्रतिक्षित भोयगाव-गडचांदूर रस्त्याचे काम सुरू :कोरपना,गडचांदूर व जिवती भागातील नागरिकांना चंद्रपुरला जाणे होणार सोयीचे :राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामे सुरू #anuity_hybrid

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
         
राजुरा विधानसभा क्षेत्रात जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने एन्युटी हायब्रीड अंतर्गत ७२० कोटी रुपये निधीचे २१२ किमीचे रस्ते मंजूर करण्यात आले होते त्याअनुषंगाने या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात विधानसभा क्षेत्रात सुरू झालेली आहे.
     
◾️यामध्ये नारंडा फाटा-कवठाळा-पवनी रस्ता लांबी २९ किमी किंमत ९० लक्ष व अतिशय जास्त मागणी असलेला बहुप्रतिक्षित भोयगाव-गडचांदूर रस्ता लांबी २१ किमी किंमत ६३कोटी,
◾️पडोली-शिवणी-कढोली-गोवरी-रामपूर-राजुरा ३६किमत - किंमत १५३ कोटी,गडचांदूर-पाटण-शेणगाव-जिवती-परमडोली-राज्यसीमा लांबी ५३ किमी,किंमत१५४ कोटी,
◾️वढोली-विट्ठलवाडा-भंगाराम तळोधी-हिवरा-पोडसा-राज्यसीमा रस्त्याची सुधारणा करणे लांबी ४५ किमी,किंमत १७० कोटी,
◾️वडकुली-बोरगाव-गोंडपीपरी-धाबा-हिवरा फाटा रस्त्याची सुधारणा करणे लांबी २६ किमी,किमंत ९० कोटी अश्या प्रकारे रस्त्याची कामे मंजूर झालेली होती.
       
राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती अतीशय खराब होती,त्यामुळे सदर रस्ते मंजूर करण्यासाठी अँड.संजयभाऊ धोटे यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याअनुषंगाने सदर कामे मंजूर करण्यात आली आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रात  पहिल्यांदाच रस्त्यांकरिता एवढा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. 
   
यामध्ये प्रामुख्याने भोयगाव-गडचांदूर हा रस्ता अतिशय खराब होता त्यामुळे कोरपना व जिवती तालुक्यातील नागिरकांना चंद्रपूरला जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता,तसेच गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सतत या रस्त्याची मागणी होत होती,परंतु सदर रस्ता मंजूर होत नव्हता,सदर रस्त्याची दखल अँड.संजयभाऊ धोटे यांनी घेत सदर रस्ता मंजूर केला, त्यामुळे जिवती,गडचांदूर व कोरपना भागातील जवळपास १५० गावातील नागरिकांना चंद्रपुर ला जाण्यासाठी सुलभ व सोयीचे होणार आहे तसेच वेळेची व आर्थिक बचतसुद्धा होणार आहे.
        
हे सर्व रस्ते विधानसभा क्षेत्रात होत असताना विकासाला चालना मिळणार आहे व विधानसभा क्षेत्रातील सर्व गावे जिल्ह्याशी जोडले जाणार आहे.
         
अँड.संजयभाऊ धोटे यांनी नारंडा येथे एन्यूटी हायब्रिडच्या रस्त्याची पाहणी केली,यावेळी रस्त्याचे  डांबरीकरण सुरू झाले होते,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,सत्यवान  चामाटे, पाटील कँस्ट्रुकॅक्षनचे शालीवान सर,गोपछेडे उपस्थित होते.