राज्यातील ५५ वर्षांवरील पोलिसांना पगारी सुट्टी :तर ५० वर्षावरील पोलिसांना फिल्डवर्क नाही, स्टेशनमध्ये काम #anil_deshmukh - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यातील ५५ वर्षांवरील पोलिसांना पगारी सुट्टी :तर ५० वर्षावरील पोलिसांना फिल्डवर्क नाही, स्टेशनमध्ये काम #anil_deshmukh

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

राज्यातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता ५० वर्षावरील २३ हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर ५५ वर्षावरील १२ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना खबरदारी पगारी सुटी दिली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज(7 जून ) ला पुणे येथील दौऱ्यादरम्यान  दिली. 

मागील तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असून पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्ग झाला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी त्या परिसरातील माहिती जाणून घेतली. तर पोलिस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधला. 

कोरोनामुळे राज्यात पोलिसांचे अनेक बळी गेले आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार ६० ते ६५ लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

पोलिसांना कोरोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.