😳 चंद्रपूर पोलिसांवरील दारुतस्करांच्या हमल्याबद्दल गृहमंत्री अनभिज्ञ ! दारुतस्करांवरील कार्यवाही संदर्भात गृहमंत्र्यांचे माहिती नसल्याचे उत्तर !#anil_deshmukh - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

😳 चंद्रपूर पोलिसांवरील दारुतस्करांच्या हमल्याबद्दल गृहमंत्री अनभिज्ञ ! दारुतस्करांवरील कार्यवाही संदर्भात गृहमंत्र्यांचे माहिती नसल्याचे उत्तर !#anil_deshmukh

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन महिन्यापासून लॉकडाउन आहे. यामुळे जिल्ह्याच्या सिमाबंद असून सिमांवर पोलिस चौक्या बसविल्या आहेत तरीही चंद्रपूर जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा पुरवठा होत आहेआणि दारू तस्कारांवर कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांवरच दारूतस्कर प्राणघातक हल्ले करीत आहेत. 

या घटनांपासून खुद्द राज्याचे गृहमंत्रीना अनिल देशमूख यांनाच अंधारात ठेवलेजात असल्याचा गंभीर प्रकार आज दि.6जूनला चंद्रपूर येथे गृहमंत्री ना.अनिलदेशमूख दौऱ्यावर आले असतांना उघडकीs आला. 

झाल्या प्रकाराबाबत पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांनाच जिल्ह्यातील कायदा वसुव्यवस्था राखणाऱ्या  पोलिसांवर दारूतस्कर हल्ले करीत आहेत त्यावर गृहखाते कायकारवाई करणार आहे असा प्रश्न विचारला असता गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती नाही,काय झाले ते माहिती घेतल्यानंतर कारवाई करण्यास गृहखाते सांगेल अशी जुजबी माहिती पत्रकारांना दिली. 

वास्तविक काल राज्याचेगृहमंत्री ना.अनिल देशमूखचंद्रपूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी  कोवीड आजाराच्या उपाययोजनासंदर्भात प्रशासनाकडून आढावा घेतला व पोलिस बंदोबस्ता संदर्भातही त्यांनी आढावा घेतला. 

त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादसाधतांना जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या कामाचे तोंडभरून कौतूक केले. आरोग्य विभागाच्याउपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले.आगामी काळात 3623 आयसोलेशन बेडतयार ठेवण्यात आले, असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.