गृहमंत्री अनिल देशमुख यांना चंद्रपूर मनपा क्षेत्रात अतिरिक्त पोलीस ठाण्याची मागणी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन देऊन अनेक अडचणींवर सविस्तर चर्चा #anil_deshmukh - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गृहमंत्री अनिल देशमुख यांना चंद्रपूर मनपा क्षेत्रात अतिरिक्त पोलीस ठाण्याची मागणी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन देऊन अनेक अडचणींवर सविस्तर चर्चा #anil_deshmukh

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आज निसर्ग चक्रीवादळाच्या पाहणी करिता राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे चंद्रपूर महानगरात सध्या कार्यरत दोनच पोलीस ठाणे असून वाढलेली लोकसंख्या व गुन्हेगारी ध्यानात घेऊन अतिरिक्त पोलीस ठाण्यांची मागणी करण्यात आली. 

चंद्रपूर महानगर क्षेत्रात सध्या दोन पोलीस स्टेशन (चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन) व मोजकेच काही भागात पोलीस चौकी कार्यरत आहेत.
 

चंद्रपूर महानगराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे दोन पोलीस स्टेशन पुरेशे नसुन त्या दोन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक भार व तनाव सतत असतो. 

शहराच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील बहुतांश भाग, लालपेठ कॉलरी वार्ड, भिवापूर वार्ड, महाकाली कॉलरी, बाबुपेठ वार्ड (बायपास रोड अलीकडील भाग) परीसर आणि शहरालगतील काही ग्रामीण भाग येतो. 

तसेच रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वडगांव वार्ड, शास्त्री नगर वार्ड, बंगाली कॅम्प, हिग्लॉज भवानी वार्ड, बाबुपेठ वार्ड (बायपास रोड पलीकडील भाग) परीसर तसेच लगतचा काही ग्रामीण भाग येतो. म्हणून या दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर सतत कामाचा खुप तान असतो. 


त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे ऍड. गणेश गिरधर यांनी नामदार श्री अनिल देशमुख यांचेकडे चंद्रपूर शहर व रामनगर या दोन्ही पोलीस स्टेशनचा कामाचा अतिरीक्त भार कमी करून संपूर्ण बाबुपेठ वार्ड, लालपेठ कॉलरी वार्ड, महाकाली कॉलरी, हिग्लॉज भवानी वार्ड व लगतच्या काही ग्रामीण भागाकरीता एक नविन पोलीस स्टेशन स्थापन करावे जेणे करून पोलीस प्रशासनास संपूर्ण प्रकरणे हाताळण्यास सोईचे होईल अशी विनंती निवेदन देऊन केली आहे.

या विषयावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली असून  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, शराध्यक्ष श्री. राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला शहाराध्यक्षा जोतीताई रंगारी, दीपक गोरडवार, नितीन भटारकर, प्रदीप रत्नपारखी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.