काल रात्रौ 18 जून ला मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रप्रदेश येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती.
बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यानुसार रात्रौ ३:०० वाजता एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्याने गाडीचा वेग अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्यामुळे त्याला थांबावे लागले. अगदी सिनेस्टाईल पधतीने पाठलाग करत बजरंग दल चे कार्यकर्ते तेथे पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली.
दोन्ही ट्रक ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले. घटनेची माहिती राजुरा पोलिस स्टेशन ला कळवीन्यात आली. आणि पोलिसांच्या मदतीने दोन्ही ट्रक राजूरा पोलीस स्टेशनला आणले . जीवावर उदार होऊन गौ मातेचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले.
पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा शेवटी आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठलीही कठोर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे चक्क राज्यमहामार्गाने मोठ मोठ्या ट्रक मधे कोंडून गौ तस्करी खुलेआम सुरू आहे. आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा असून रोज गाई ची कत्तल सुरू आहे . यात प्रशासनाने जातीने लक्ष घालावे अशी मागणी बजरंग दल करत आहे .
पुढील तपास पोलिस स्टेशन राजुरा, करत आहे. त्या ट्रक ड्रायव्हर वर काय कार्यवाही होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र- तेलंगांना -आंध्रप्रदेश असा गौ तस्करीचा प्रकार अनेकदा घडतो आहे. कधी पायदळ तर कधी मोठ -मोठ्या ट्रक ने ही तस्करी होते. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसतांना अगदी जनावरे मरे पर्यंत हा जीवघेणा प्रकार घडतो आहे. त्यामुळे गौ रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून हे गौ बचावाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अश्या अवैध गौ तस्करांच्या मुस्क्या आवडने आवश्यक झाले आहे.