चंद्रपूरात 62 वर्षीय व्यक्ती बाधीत... संख्या पोहचली 27 वर , अॅक्टीव्ह रूग्ण 5 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूरात 62 वर्षीय व्यक्ती बाधीत... संख्या पोहचली 27 वर , अॅक्टीव्ह रूग्ण 5

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर महानगरातील भिवापुर वॉर्ड परिसरातील एक ६२ वर्षीय व्यक्ती शुक्रवार दिनांक ५ जून रोजी कोरोना बाधित आढळले.जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रुग्ण म्हणून अती दक्षता कक्षात दाखल बाधीताच्या स्वॅबचा अहवाल आज ५ जून रोजी पॉझिटीव्ह आला. 

त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप व खोकला होता. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते काल ४ जून रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. 

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २७ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ५ आहे.