रुग्ण 57 : चंद्रपुरात आणखी एक बाधित : आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली : जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधितांची संख्या 14 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्ण 57 : चंद्रपुरात आणखी एक बाधित : आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली : जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधितांची संख्या 14 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर –  

चंद्रपूर महानगरातील स्नेह नगर परिसरातील २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित नागरिकांची संख्या ५७ झाली आहे. हा युवक १३ जून रोजी मुंबईवरून परत आला होता. त्याला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली. २१ जून रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आले होते. २२ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ बाधित बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये केवळ १५ अॅक्टिव्ह बाधित आहेत.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) आणि २२ जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५७ झाले आहेत.आतापर्यत ४३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५७ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १४ झाली आहे.