रुग्ण 42: चंद्रपूर जिल्ह्यात 3 नवे कोरोना बाधित : अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 19 #Covid-19-3-new-corona-positive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्ण 42: चंद्रपूर जिल्ह्यात 3 नवे कोरोना बाधित : अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 19 #Covid-19-3-new-corona-positive

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर –

 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री आणखी तीन नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका बाधितांची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) आणि ९ जून ( एकूण ३ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४२ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १९ आहे.