चोर बिटी तस्कर पोलिसांच्या जाळ्यात :400 चोर बीटी पॉकिट जप्त : गोंडपीपरी तालुक्यातील धानापूर येथे पोलीस विभाग कृषी विभागाची संयुक्त कारवाई #btcotton - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चोर बिटी तस्कर पोलिसांच्या जाळ्यात :400 चोर बीटी पॉकिट जप्त : गोंडपीपरी तालुक्यातील धानापूर येथे पोलीस विभाग कृषी विभागाची संयुक्त कारवाई #btcotton

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी-

महाराष्ट्रात चोर बिटी बियानांवर बंदी आहे.मात्र बंदीतही याची ज्यादा पैशाच्या कमाईमुळे चोर मार्गे  या बियानाची सर्रास विक्री सुरू आहे.काल मंगळवार (ता.3) रात्रीच्या ११ च्या सुमारास ४०० पॉकेट जप्तीची कारवाई करण्यात आली.सदर प्रकरणी धानापुरातील गजाणन ढवस ,साईनाथ वडसकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी धावपळ करीत आहे.जमिनीची पूर्वपेरणी व मशागत कामाना वेग आलेला आहे.शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाणधारक दुकानदारांकडून बियाणे खरेदी करण्याचे आव्हाहन प्रशासनाने केले आहे.तेलंगणा सीमेलगत गोंडपिपरी तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात चोर बीटी बियाणांची विक्री होत असते.

छुप्या मार्गाने विक्री करणारे रॅकेट तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना व कृषी विभागाला होती.
तालुक्यातील एक मोठा शेतकरी व काही राजकीय पक्षाचे नेते मिळून तालुक्यात चोर बीटी विक्रीचा गोरखधंदा सुरु होता.

मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत ठाणेदार संदिप धोबे कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी विजयकुमार कोंमला,रतनसिंग चव्हाण यांनी ४०० बी टी बियाणाचे पॉकिट जप्त केले.

पुढील तपास ठाणेदार धोबे व कृषिअधिकारी मंगेश पवार करीत असून.ही चोर बिटी बियाणे नेमके आले कुठून हा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला असून पोलिसांसमोर ती बीटी आली कुठून हे शोधणे आव्हान असणार आहे.