भाग 3 : माहिती अधिकारात माहिती मागितल्याने कर्मचार्‍याचे निलंबन : श्री साई पॉलिटेक्निक येथील प्रकार #shri-sai-politechnic-college-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाग 3 : माहिती अधिकारात माहिती मागितल्याने कर्मचार्‍याचे निलंबन : श्री साई पॉलिटेक्निक येथील प्रकार #shri-sai-politechnic-college-chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर  :  

श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपूर येथे कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र येथून बोगस सोसायटी अंतर्गत करोडोचे कर्ज उचल करीत या सर्व कर्मचाऱ्यांची कशी फसवणूक व पिळवणूक शहरातील नामवंत म्हणवून घेणाऱ्या एम डी येरगुडे मेमोरियल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे सुरु असल्याची वृत्त मालिका सुरु असून दररोज यातील विविध प्रकार समोर येत आहेत. विषय मोठा व विविध वळनी असल्याने संपूर्ण प्रकार व घटनाक्रम एकाच वृत्तात प्रकाशित करणे शक्य नसल्या कारणाने भागांमध्ये प्रकाशीकरण सुरु असून नव्या वाचकांनी आजचा भाग 3 वाचण्यापूर्वी या आधीचे दोन भाग खालील प्रमाणे (हेडलाईन वर क्लिक करून ) वाचावा. 📌 भाग 3 : माहिती अधिकारात कर्जाबाबत माहिती मागितल्याने कर्मचारी निलंबित व विस्मयास्पदरित्या मागील तारखेत दाखवून निलंबन मागे.👇👇👇

श्री. साई तंत्र निकेतन संस्थेत कार्यरत कर्मचार्‍यांनी माहिती अधिकारात कॉलेजची माहिती व  नियमाप्रमाणे पगार वाढ  मागितल्याने संस्थेने बेकायदेशीर रित्या येथील कर्मचारी सचिन ढेंगळे यांचे निलंबन केल्याने संतप्त सारती असोसिएशने महाराष्ट्र राज्य यांनी नुकतेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

श्री साई तंत्र निकेतन,चंद्रपूर येथे २००७ पासून काही कर्मचारी काम करीत आहे.या संदर्भात साई तंत्रनिकेतन समन्वय समिती चंद्रपूरने संस्थेच्या या बेजबाबदारपणा विरोध हल्लाबोल धरणे आंदोलन केले. 

या संदर्भात प्राध्यापक व प्राचार्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सुध्दा जिल्हाधिकारी यांना ४ मार्च २०२० ला देण्यात आले होते. मात्र सदर प्राध्यापक व प्राचार्यावर अद्यापक कोणतीही कारवाई झालेली नाही. 

दरम्यानच्या काळात कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र अजूनही त्यांचे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच या ठिकाणी बोगस सोसायटी कागदोपत्री उघडून  अनेक कर्मचार्‍यांच्या सह्या घेवून कर्मचार्‍यांच्या नावे कर्जाची उचल केल्याचे दाखविले आणि कर्मचार्‍यांवर दबाव तंत्राचा उपयोग करून भाग पाडल्याचे कर्मचार्‍यांनी सदर निवेदनात नमूद केले आहे.

सदर संस्थेने अटी व शर्ती नूसार पगार, वेतन,भत्ते,रजा व इतर सर्व गोष्टी देणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर नमूद करून परवानग्या मिळविलेल्या आहेत.

अशा गैरकारभार करणार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी श्री साई तंत्रनिकेतन समन्वय समितीचे अध्यक्ष -राकेश टोंगे, उपाध्यक्ष- भूपेश पिपंळशेडे, सचिव-राजू गौरकार, जिल्हा सारती असोसिएशन सचिव-श्री.सचिन रोडे,जिल्हा सारती असोसिएशन अध्यक्ष-श्री. सचिन ढेगळे,जिल्हा  सारती असोसिएशन उपाध्यक्ष श्री.गणेश काकडे व सारती असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. देवेंद्र सायसे, अध्यक्ष श्री.योगेश ढगे यांनी  निवेदनातून जिल्हाधिकारी साहेब यांना 08/06/2020 रोजी समिती स्थापन करून चौकशी करण्याबाबत निवेदन सादर केले. 

यानंतर श्री. साई तंत्रनिकेतन चंद्रपूर चे प्राचार्य  शिशिर पिलारे यांनीं पीडित कर्मचारी  देवेंद्र सायसे फोन करून प्रकरण दाबण्यासाठी दबाव व अमिश तंत्राचा वारंवार वापर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सायसे यांनी सांगितले. देवेंद्र सायसे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत व कोणत्याही दबावाला बळी न पडता दिनांक 10 /06/ 2020 रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेतल्याने श्री. सचिन धेंगळे या कर्मचाऱ्यांचे निलंबन 10/06/2020 रोजी  संस्था अध्यक्ष व प्राचार्य यांनी निलंबन मागे घेतले परंतु त्यातही 10 जून ला निलंबन मागे घेतले असले तरीही निलंबन रद्दबाबत पत्र 28 फेब्रुवारी 2020 या तारखेचे देण्यात आले असून  पिळवणूक सुरूच असल्याची प्रतिक्रिया निलंबित कर्मचाऱ्यानी दिली आहे.