खबरकट्टा / चंद्रपूर :
गडचांदूर येथे बाहेरून आलेला एक युवकाचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आला असून तो होम ˈक्वॉरन्टीन् असलेला वॉर्ड क्रमांक 5 येथील स्टेट बॅंकेसमोरील एरिया सिल करण्याची प्रशासनिक कार्यवाही सुरु असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज आलेल्या माहिती नुसार आज चंद्रपूर मधील गडचांदूर येथे आज नवीन रुग्ण मिळाला आहे. सदर रुग्ण हा दिल्लीवरून आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर रुग्णाचे 4 तारखेला स्वॅप घेण्यात आले असून आज त्याचा रिपोर्ट पोझीटीव्ह आला असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 29 वर पोहचली आहे. सध्या युवक वास्तव्य करत असलेला परिसर सिल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. कोरपना तालुक्यात मिळालेला हा पहिला रुग्ण आहे.
या रुग्णसंबंधित सविस्तर माहिती लवकर याचं लिंक वर अपडेट करण्यात येईल काही वेळानंतर हीच लिंक ओपन करून वाचा सविस्तर.