रुग्ण 28 : ब्रम्हपुरी तालुल्यातील एक व्यतिरिक्त बाधित :अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण 6 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्ण 28 : ब्रम्हपुरी तालुल्यातील एक व्यतिरिक्त बाधित :अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण 6

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


ब्रम्हपुरी तालुक्यातील अडयाळ टेकडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणारे २८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा स्वॅब अहवाल आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा युवक मुंबई येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. २ जून रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. 


मात्र अहवाल अनिश्चित होता. लक्षणे दिसून आल्याने काल ५ जून रोजी युवकाचा पुन्हा स्वॅब अहवाल घेण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे. बाधीताची प्रकृती स्थिर आहे.या सोबतच जिल्हयातील कोरोना बाधीतांची संख्या २८ झाली आहे.


चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २८ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २८ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ६ आहे.