ब्रेकिंग चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांवर थेट कार्यवाही :अजयपुर जवळ अंधारी नदी पात्रातुन जेसिबी हायवा जप्त : तब्बल 25 लक्ष 77 हजारच्या मुदद्ेमालासह 2 चालक आरोपीस अटक : मालक लियास खान व सचिन कत्याल यांना अटक होईल की राजकीय दबावातून सुटका -सामान्यांना पडला प्रश्न??? #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांवर थेट कार्यवाही :अजयपुर जवळ अंधारी नदी पात्रातुन जेसिबी हायवा जप्त : तब्बल 25 लक्ष 77 हजारच्या मुदद्ेमालासह 2 चालक आरोपीस अटक : मालक लियास खान व सचिन कत्याल यांना अटक होईल की राजकीय दबावातून सुटका -सामान्यांना पडला प्रश्न??? #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

रामनगर पोलीसांची अवैध रेती तस्करी विरुद्ध कार्यवाही २५ लक्ष ७७ हजारच्या मुदद्ेमालासह २ आरोपी अटक दिनांक २०/०६/२०२० रोजी रामनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा अजयपुर जवळ अंधारी नदी शेजारील शेतात एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने रेती उचलुन हायवा ट्रक द्वारा चोरून नेत आहे. 

अशा माहितीवरून रामनगर पोलीसांनी तलाठी कर्मचारी यांचेसह अंधारी नदी जवळ जाऊन पाहणी केली असता, एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने हायवा ट्रक मध्ये रेती लोड करीत होता. यावरून जेसीबी चालक आरोपी नामे तुळशिराम भाउजी देवतळे आणि हायवा ट्रक चालक आरोपी नामे आदिल खान अहमद खान रा. बाबुपेठ यांना अटक करण्यात आली.

सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क. ५४३/२०२० कलम ३७९,१८८,३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरच्या गुन्हयात एक जेसीबी मशीन क्र. एमएच ३४ एपी ३४३३ किं. १५,००,०००/-रू, एक हायवा ट्रक क. एमएच३४ एम ३६६४ किं.१०,००,०००/-रू, ३१ ब्रॉस रेती किं.७७,५००/-रू असा एकुण २५,७७,५००/-रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनात पोनि. रामनगर श्री. प्रकाश हाके यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

परंतु सदरच्या गुन्हयात राज्य परिवाहन विभागाच्या (RTO) अधिकृत नोंदणी नुसार  जेसीबी मशीन क्र. एमएच ३४ एपी ३४३३ चे मालक सचिन कत्याल व हायवा ट्रक क. एमएच३४ एम ३६६४ चे मालक लीयाज खान यांना सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक होणार की कत्याल यांच्यावर एका बड्या राजकीय नेत्याच्या असलेल्या वरदहस्तामुळे मूळ मालकांवर कार्यवाही टाळून फक्त जेसीबी-हायवा चालकांवरच कार्यवाही वर समाधान मानावे लागेल काय  याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.