भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क अभियान सुरू कोरपना तालुक्यातील कोडशी(बु)-नारंडा-भोयगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल 24 बूथ वर जनसंपर्क भाजयुमो जिल्हा सचिव तथा तालुका सहसंयोजक आशिष ताजने यांच्या नेतृत्वात अभियान सुरू जनतेकडून जनसंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद #bjym - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क अभियान सुरू कोरपना तालुक्यातील कोडशी(बु)-नारंडा-भोयगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल 24 बूथ वर जनसंपर्क भाजयुमो जिल्हा सचिव तथा तालुका सहसंयोजक आशिष ताजने यांच्या नेतृत्वात अभियान सुरू जनतेकडून जनसंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद #bjym

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी सरकारच्या २.० वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाला कोरपना तालुक्यातुन कोडशी-नारंडा-भोयगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील जेवरा या गावातून सुरवात करण्यात आली.

यामध्ये मोदी सरकारने देशातील जनतेकरिता घेतलेले लोकहितकारी निर्णय जनतेपर्यंत पोहचविणे तसेच मोदी सरकारच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला झाला आहे याचा सर्व्ह करणे तसेच प्रत्येक बूथ वर प्रत्येकी १०० कुटुंब सर्वक्षण अहवाल जनतेकडून भरून घेतला जाणार आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,माजी आमदार अँड.संजय धोटे,अभियान संयोजक देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा,जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

तसेच मोदी सरकारने दुसऱ्या टर्म मध्ये ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय असेल,राम मंदिर,३तलाक, CAA व NRC सारखा कायदा देशात लागू करण्याचा निर्णय असेल गरीब जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री आवास योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना,प्रधानमंत्री जनऔषधी योजना,जनधन योजना,महिलांकरिता उज्वला गॅस योजना असेल अश्या अनेक योजना मोदी सरकारने राबवून देशातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केले आहे.

भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची या अभियानात कोरपना तालुका सहसंयोजक म्हणून पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली आहे.

कोरपना तालुक्यातुन जेवरा या गावातून कोरपना तालुका संयोजक तथा सरपंच अरुण मडावी यांच्या हस्ते या अभियानाची सुरवात झाली आहे.

जिल्हा परिषद क्षेत्रात जेवरा,तुकडोजी नगर,तांबाडी, गांधीनगर,तुळशी,हेटी,कोडशी खुर्द,माथा, शेरज बु,शेरज खुर्द,लोणी,पिपरी,वनोजा,अंतरगाव,संगोडा,हिरापूर,आवाळपूर,भोयगाव,भारोसा,इरई,बोरगाव,गाडेगाव,सोनूलरी,लोणी,पिपरी इत्यादी गावांना भेटी देऊन मोदी सरकाने केलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी तालुका संयोजक अरुण मडावी,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,शक्ती केंद्र प्रमुख सत्यवान चामाटे,नैनेश आत्राम,दिनेश खडसे,किशोर देवतळे,घनश्याम ताजने, हेटी सरपंच बालभारती जरिले,कोडशी खुर्द सरपंच टोंगे,वनोजा सरपंच सविता पेटकर,हिरापूर सरपंच प्रमोद कोडापे,पिपरी सरपंच कवडू पाटील कुंभारे,लोणी उपसरपंच संजय पिंपळशेंडे,प्रवीण साखरकर, गजानन बोर्डे,ज्ञानेश्वर महात्मे,बंडू पाटील वडस्कर,अनिल मोहितकर,विशाल पावडे,साजिद उमरे,रवी टेकाम, हरी बोढे, भोयगाव माजी सरपंच बंडू जूनघरी,गणेश आसस्कर,प्रमोद बांदूरकर उपस्थित होते.

सदर अभियानाला जनतेकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.तसेच अनेक लाभार्थ्यांनी मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घेतला असल्यामुळे त्यांनी मोदी सरकारचे आभार व्यक्त केले आहे.