भाग 2-श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज येथे कश्या पद्धतीने शिक्षकांच्या नावे करोडोचे कर्ज उचलल्या गेले :वाचा सविस्तर #shri-sai-politechnic-college-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाग 2-श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज येथे कश्या पद्धतीने शिक्षकांच्या नावे करोडोचे कर्ज उचलल्या गेले :वाचा सविस्तर #shri-sai-politechnic-college-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भाग 2-श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज येथे कश्या पद्धतीने शिक्षकांच्या नावे करोडोचे कर्ज उचलल्या गेले (सविस्तर विश्लेषण )


खबरकट्टा ला शिक्षकांनी सादर केलेल्या पगारी पावत्या कागदपत्रांनुसार एका अनुभवी व वरिष्ठ शिक्षकाचे पूर्ण वेतन 99,800/- असे कागदपत्रात (शिक्षण विभाग, राज्य शासन व बँक ऑफ महारष्ट्राकडे सादर केलेल्या ) दाखविण्यात आले आहे. त्यातून विविध मथड्याखाली कपात दाखविण्यात आली आहे. जसे -इपीएफ /पीटी /एलआयसी चे 4914/- रुपये कपात व सोसायटी /कर्ज /एफडी या मथड्याखाली 66570/ -रुपयांची कपात दाखविण्यात आली असून उर्वरित 28316/- रुपये सर्व कपातीअंती वेतन उचल असल्याचे नोंद आहे. 

दुसऱ्या एका शिक्षकाच्या वेतन पावतीत पूर्ण पगार 67800/- नमूद असून इपीएफ /पीटी /एलआयसी/ आयटी या मथड्यात 2480/- रुपये कपात तर सोसायटी /कर्ज /एफडी या मथड्याखाली 24800/ -रुपये (कर्ज हप्ता )ची कपात करण्यात येऊन एकूण शिल्लक वेतन 27280/- ची उचल होत असल्याचे नमूद आहे. 

ज्या कागदपत्रांदरवारे ही हेराफ़ेर उघड झाली आहे त्या सर्व बनावटी कागदपत्रांवर संस्थेचे लेखापाल, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष व बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा व्यवस्थापकांच्या सह्या व अधिकृत शिक्के आहेत. परंतु या कागदोपत्री वेतन व प्रत्यक्षात शिक्षकांना दिला जाणारे वेतन यात मोठी तफावत असून विषेश म्हणजे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणतीही सोसायटी नसून, हे सर्व कोणत्याही इतर सोसायटी चे सदस्य नाहीत. 

यावरून स्पष्ट उघड होते की शिक्षकांची बोगस सोसायटी उघडून त्यात या सर्व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा सऱ्हास गैरवापर करत त्यांना अंधारात ठेऊन संस्थाचालकांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथून मोठी कर्ज उचल करत कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. 

शिवाय वरील माहितीत सोसायटी /कर्ज /एफडी या मथड्याखाली कपात केल्या जाणाऱ्या आकड्यांवरून कर्जाच्या रकमेचा अंदाज येतो. या सहा आकडी कर्जांची उचल करताना कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पॅन नंबर चा उपयोग झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांनी कधीही न उचललेल्या कर्जाचा सिबिल बोझा चढला असल्याची दाट शक्यता असून पीडित  सर्व कर्मचाऱ्यांना भविष्यात गरज पडल्यास या सिबिल रेकॉर्ड चा त्रास होणे निश्चित आहे. 

या सर्व गंभीर प्रकाराबाबत साई पॉलिटेक्निक समन्वय समिती द्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यानिशी तक्रार सादर करण्यात आली असून अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज उचल करून साई पॉलिटेक्निक येथे 35 शिक्षक व 24 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे अनेक कागदोपत्रांती समोर आले आहे.

भाग 3 : माहिती अधिकारात कर्जाबाबत माहिती मागितल्याने कर्मचारी निलंबित व विस्मयास्पदरित्या मागील तारखेत दाखवून निलंबन मागे. 

भाग 4 : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अवघ्या 4 किलोमीटर वर असलेल्या श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज ला भेटायला लागतात तब्बल 45 दिवस (लॉकडाऊन चा संबंध नाही )