कमालच ! कुत्रा हाकतो बैलगाडी ! भद्रावती तालुक्यातील कुतूहल : दररोज 2 किलोमीटर बैलगाडी चालविणारा तो कुत्रा #dog-drives-a-bullock-cart-daily-2-kelometer - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कमालच ! कुत्रा हाकतो बैलगाडी ! भद्रावती तालुक्यातील कुतूहल : दररोज 2 किलोमीटर बैलगाडी चालविणारा तो कुत्रा #dog-drives-a-bullock-cart-daily-2-kelometer

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वास्तविकतेत बैलगाडी बैल ओढत असतात, पण त्याखालून चालणार्‍या कुत्र्याला वाटते, ही बैलगाडी आपणच ओढून नेत आहोत, अशा आशयाची एक म्हण दैनंदिन जीवनात रूढ आहे. पण भद्रावती परिसरात मात्र खरंच, एक कुत्रा बैलगाडी चालवतो!

भद्रावती शहरातील गवराळा ते चिरादेवी या मार्गावर कुत्रा चक्क बैलगाडी चालवित असल्याचे चित्र दिसून येत असून, सध्या परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. कुत्रा हा शेतकर्‍यांचा अगदी पारंपारिक मित्र राहिला आहे. बहुतेक शेतकर्‍यांजवळ पाळीव कुत्रा हा असतोच. 

शेताची राखण, पाळीव जनावरांचे रक्षण आदी शेतकर्‍यांची कामे तो इमानेइतबारे करीत असल्यामुळे तो शेतकर्‍यांच्या कुटुंबातील घटकच झालेला असतो. मात्र, या कुत्र्याने आपल्या पारंपारिक कामासह चक्क बैलगाडी चालविणे शिकले आहे. शहरातील गवराळा वॉर्डात राहणारे विजय थुल यांचा हा हुशार कुत्रा आहे.

थुल यांनी जवळच्या चीरादेवी परिसरात 8 एकर शेती ठेक्याने घेऊन तेथे शेती व्यवसाय सुरू केला आहे. घर ते शेती हे अंतर जवळपास दीड किलोमीटरचे आहे. दररोज शेतीत जाण्यासाठी विजय थुल हे आपल्या गवराळा येथील घरातून बैलगाडी जुंपतात. एकदा का बैलगाडी जुंपली, की तीचा ताबा त्यांचा चाणाक्ष कुत्रा घेतो. मालकाची वाट न पाहता तो बैलगाडी पुढे दामटतो. 

मालकाच्या पुढेच 2 किलोमीटर अंतरावरील शेतात पोहोचतो. या 2 किलोमीटरच्या अंतरात एक रेल्वे बोगदा व आडवळण मार्ग पडतो. मात्र, अतिशय कुशलतेने रस्त्यात येणारी वाहने व रेल्वे बोगदा पार करीत व कोणालाही इजा होऊ न देता तो शेतात पोहचतो. मालकाच्या पुढे हा कुत्रा एकटाच बैलगाडी नेत असल्यामूळे अनेकदा थुल यांना शेतापर्यंतचा प्रवास मागे-मागे पायी करावा लागतो.

क्लिक करा -बातमी वाचा : दिवसा वेडसर -रात्री अट्टल चोर !

प्रारंभी,थुल यांना कुत्रा बैलगाडी चालविताना इतर पादचार्‍यांना इजा होईल, अशी भीती वाटायची. मात्र, कुत्र्याच्या या कुशल ‘ड्रायव्हिंग’मुळे त्यांची ती भीतीही गेली. शेतीत बैलगाडी नेण्याचा या कुत्र्याचा सततचा दिनक्रमच झाला आहे. बैलगाडी चालविण्याच्या या कुशलतेमुळे तो सर्वांचे आकर्षण ठरला आहे. प्रामाणिकतेचा प्रतीक असलेला कुत्रा आता अशा प्रकारे शेतकर्‍यांचा यथायोग्य सहकारीही ठरला आहे.