चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरु असून जिल्ह्यातील सर्व वाळू घाटांसहित लहान सहान नदी नाल्यांवर वाळूचे सऱ्हास उत्खनन व वाहतूक सुरु असून गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वरदहस्तामुळे महसूल प्रशासनासमोर हा वाळू तस्करी प्रश्न आवासून उभा आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतून प्रशाशनाकडे वाळू तस्करी बद्दल निवेदने -तक्ररी प्राप्त होत असल्या तरीही फक्त लहान ट्रॅक्टर धारकांवर कार्यवाही करीत बडया असामींकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड जिल्ह्याभरातुन होत असताना जिल्हा प्रशासन सुद्धा आता या तक्रारींवर गंभीर दखल घेत असल्याचे काहीसे चिन्ह आहेत.
कालच भद्रावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व इतर तीन तस्करांवर गुन्हा नोंदवित दोन हायवा जप्त केल्या नंतर आज जिल्ह्यातील प्रसिद्धी बांधकाम कंत्राटदार असलेल्या एन.एम.पुगलीया प्लांटमध्ये अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला.
घुग्गुस महामार्गावरील महाकुर्ला गावाजवळील रस्त्यालगत एन.एम.पुगलीया कंपनीचा डांबर प्लांट आहे.या डांबर प्लांटवर धाड टाकुन आत साठवुन ठेवलेला अवैध वाळू साठा चंद्रपूरचे नायब तहसीलदार राजु धांडे यांनी पथकासह कारवाही करुन जप्त केला.
त्यांनी राॅयल्टी बाबत विचारना केली असता त्या वाळू साठ्याची राॅयल्टी नव्हती त्यामुळे पंचासमक्ष १९०.८१ ब्रास अवैध रेती साठा जप्त करुन सुर्फुतनामा तयार करुन तिथेच ठेवण्यात आली.एन.एम.पुगलीया प्लांटमध्ये अवैध वाळू साठा महसुल प्रशासनाने जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.