◾️ जिल्हाधिकारी महोदयांना माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द
राजुरा तालुक्यातील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा च्या वतीने कोरोना व्हायरस विषाणू च्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मा. जिल्हाधिकारी सहायता निधी कोविड-19 करिता अनेक सेवाभावी संस्थांनी भरीव आर्थिक मदत केलेली आहे.
याच धर्तीवर खारीचा वाटा म्हणून म्हणून विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा (ता. राजुरा) च्या वतीने 51 हजार रुपयाचा धनादेश दी. 9/6/2020 रोज मंगळवरला संस्थेचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सुपर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव तथा प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय रामपूर - आर्वी चे मुख्याध्यापक मनोज पावडे, प्रियदर्शिनी माध्यमिक विद्यालय साखरी चे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, प्रियदर्शिनी माध्यमिक विद्यालय शेनगाव चे मुख्याध्यापक नितिन कडवे, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सिंधी चे मुख्याध्यापक बजरंग जेनेकर उपस्थित होते.
छोट्या का होईना या केलेल्या मदती बद्दल मा. जिल्हाधिकारी महोदयांनी समाधान व्यक्त केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कोरॉना व्हायरस मुळे प्रभावित झालेल्या गरीब मजुरांना अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून मदतीचा हात दिला होता.
ही संस्था नेहमी समाज कार्यात अग्रेसर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्यामुळे संस्थेच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे. या मदतीत संस्थेच्या पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे सचिव मनोज पावडे यांनी आभार व्यक्त केले आहे.